परवडणार्‍या घरांची गोव्यात मोठी वानवा

0
12

गोवा राज्य सेकंड होम लक्झरी सेगमेंट मार्केट बनले असले, तरी गोवा हे परवडणार्‍या घरांच्या बाबतीत मागे आहे, असा दावा नॅशनल रिअलटर्स असोसिएशनने (एनएआर-इंडिया) आयोजित पत्रकार परिषदेत काल करण्यात आला.

नॅशनल रिअलटर्स असोसिएशनच्या कार्यकारी समितीची दोन दिवसीय बैठक जुने गोव्यातील कदंब पठारावरील एका हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीनंतर असोसिएशनचे पदाधिकारी चेअरमन रवी वर्मा, अध्यक्ष समीर अरोरा, अमित चोप्रा व इतर पदाधिकार्‍यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

डॉक्टर, अभियंते, वकील हे एका परवान्याच्या माध्यमातून देशात कुठेही व्यवसाय करू शकतात. त्याच धर्तीवर रिअलटर्सना सुध्दा मान्यता मिळाली पाहिजे. रिअलटर्सना प्रत्येक राज्यात व्यवसाय करण्यासाठी वेगवेगळा परवाना घ्यावा लागत आहे. त्यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे, असे एनएआरच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.