परराष्ट्रमंत्री जयशंकर पाकिस्तानला जाणार

0
6

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे 15-16 ऑक्टोबरला पाकिस्तानला भेट देणार आहेत. ते इस्लामाबादमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत सहभागी होतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ही माहिती दिली. गेल्या 9 वर्षात पहिल्यांदाच भारतीय मंत्री पाकिस्तानला भेट देणार आहेत. एससीओच्या कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट (सीएचजी) चे अध्यक्षपद यंदा पाकिस्तानकडे आहे.