परप्रांतीय युवकाचा युवतीवर हल्ला

0
5

कोरगाव येथे काल एका युवतीवर परप्रांतीय युवकाने हल्ला केला. यावेळी घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी सदर युवकाला चोप दिला. मिळालेल्या माहितीनुसार, कोरगाव येथील एक युवती आपल्या कामावरून बसमधून घरी येत होती, त्याच बसमधून एक परप्रांतीय युवक हा पालये येथे जात होता.

सदर युवती कोरगाव येथे एका ठिकाणी बसमधून उतरल्यानंतर तो युवक देखील तेथेच उतला. त्यानंतर त्याने सदर युवतीचा गळा घट्ट आवळून तिला बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघांमध्ये बरीच झटापट झाली. यावेळी सदर युवतीने आरडाओरडा केल्यानंतर काही नागरिक घटनास्थळी जमले. आणि त्यांनी सदर युवकाला चोप दिला. या प्रकारानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सदर युवकाला वाहनात बसवून नेण्याचा प्रयत्न केला; मात्र स्थानिकांनी पोलिसांचे वाहन रोखून धरले. याबाबत रात्री उशिरापर्यंत अधिक माहिती मिळू शकली नाही.