परदेशात नोकरीच्या आमिषाने गंडवले

0
109

परदेशात नोकरी देतो असे सांगून १० लाख २३ हजार रुपयांना गंडवल्याची तक्रार काणका-वेर्ला येथील रॉबर्ट पिंटो यांनी केल्यानंतर म्हापसा पोलिसांनी नवेवाडे वास्को येथील नितीश गणेश कुंभारजुवेकर नाईक (३८) व ठाणे-मुंबई येथील अजय वीरसिंग राठोड याला अटक केली. एप्रिल २०१३ मध्ये दोघांनी परदेशात नोकरीसाठी पाठवतो असे सांगून हे पैसे घेतले होते. दरम्यान, पोलीस नितीशच्या पत्नीच्या शोधात आहेत.