पद्मभूषण, प्रख्यात चित्रकार लक्ष्मण पै यांच्या पार्थिवांवर आज गुरुवार १८ मार्चला संध्याकाळी ४ वाजता मडगाव येथील हिंदू स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पै यांना पोलीस दलाकडून मानवंदना दिली जाणार आहे.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी राज्य सरकारकडे पद्मभूषण लक्ष्मण पै यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची मागणी केली होती. पद्मभूषण पै यांचे रविवार १४ मार्चला दोनापावल येथील निवासस्थानी निधन झाले.
पै यांचे पार्थिव गुरुवार १८ रोजी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत दोनापावल येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव मडगाव येथील त्यांच्या मूळ घरी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. अंत्ययात्रेला संध्याकाळी ३.३० वाजता प्रारंभ होणार आहे. अंत्ययात्रेत सहभागी होणार्यांना कोविड नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे.