पत्रकारांना मारहाण प्रकरणी हरयाणा सरकारला सुप्रीम कोर्टाची नोटीस

0
75

स्वयंघोषित अध्यात्म गुरू रामपाल याच्या अटकेसाठीच्या मोहिमेदरम्यान पोलिसांकडून पत्रकारांना झालेल्या कथित मारहाणप्रकरणी काल सर्वोच्च न्यायालयाने हरयाणा सरकारवर नोटीस बजावली आहे. हिसार येथे पोलीस व रामपाल यांच्यात उडालेल्या धुमश्‍चक्रीदरम्यान पत्रकारांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या अनुषंगाने काही पत्रकारांनी न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने मान्यता दिली. विकास चंद्रा, प्रभाकर मिश्रा व श्रीनिवास या व अन्य काही पत्रकारांनी ही याचिका दाखल करून कोणत्याही पूर्वसूचनेविना व खबरदारी विना आपल्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराबद्दल त्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. तसेच जखमी पत्रकारांना नुकसान भरपाई देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.