पत्नीच्या खूनप्रकरणी संशयित आल्फ्रेड पेरेरा याला कोठडी

0
33

कराशिरमळ आगोंदा येथील सोनिया मोंतेरो या महिलेची तिचाच पती आल्फ्रेड परेरा याने शनिवारी रात्री बंदीच्या गोळीने हत्या केली होती. हत्या केल्यानंतर लगेचच संशयित परेरा हा काणकोणच्या पोलिसांना शरण आला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिस कस्टडीत ठेवले आहे.

काणकोण पोलिस स्थानकाचे उपअधीक्षक शिवेंदू भूषण यांच्या मार्गदर्शनाखाली काणकोणचे पोलीस निरीक्षक तुळशिदास नाईक यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि या हत्येसाठी वापरण्यात आलेली बंदुक ताब्यात घेतली आहे. पोलीस निरीक्षक तुळशिदास नाईक पुढील तपास करीत आहेत.

कराशिरमळ आगोंदा येथे आल्फ्रेड पेरेरा (४३) याने आपली पत्नी सोनिया मोंतेरो (३३) हिच्यावर वैवाहिक वादातून बंदुकीची गोळी झाडून तिची शनिवारी हत्या केली. गोळी झाडल्यानंतर जखमी अवस्थेत सदर महिलेला काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र तोवर तिचा मृत्यू झाला होता. सोनिया हिची आई आमेलिया यांनी काणकोण पोलीस स्थानकात तक्रार केल्यानंतर काणकोण पोलिसांनी संशयित आल्फे्रड पेरेरा याला ताब्यात घेतले. हत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.