पतसंस्थांतील घोटाळ्याची प्रकरणे जलदगतीने निकालात काढणार

0
10

>> अर्थमंत्री प्रमोद सावंत यांचे विधानसभेत आश्वासन

राज्यातील काही सहकारी पतसंस्थांनी व वित्तसंस्थांनी खातेदार व गुंतवणुकदारांच्या कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्याची जी प्रकरणे घडलेली आहेत, त्यांच्याविरुद्धचे खटले जलदगतीने हातावेगळे करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असे आश्वासन काल अर्थमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत दिले.
शून्य प्रहराला विजय सरदेसाई यांनी उपस्थित केलेल्या यासंबंधीच्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी वरील आश्वासन दिले. माशेल येथील महिला सहकारी पतसंस्थेने 18 कोटी रुपयांचा घोटाळा करताना खातेदार व गुंतवणूकदारांचे पैसे लुटले असल्याचे सरदेसाई यांनी सभागृहाच्या नजरेस आणून दिले. आपण घेतलेल्या जनता दरबारच्या वेळी लोकांनी आपणाला ही माहिती दिल्याचे सरदेसाई म्हणाले.
यावेळी उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी या संबंधीचे खटले जलदगतीने हातावेगळे करण्यासाठी पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन दिले.