पणजी स्पोटर्‌‌स क्लबला आल्बर्ट डेव्हलपर्स चषक

0
143

रणजीपटू रॉबिन डिसोझाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पणजी स्पोटर्‌‌स क्लबने यजमान आल्बर्ट डेव्हलपर्स टायगर्स संघाचा ८३ धावांनी पराभव करीत पहिल्या आल्बर्ट डेव्हलपर्स टी -२० सीझनबॉल क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.

कांपाल पणजी येथील सागच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पणजी स्पोटर्‌‌स क्लबने २० षट्‌कात ६ गडी गमावत १६७ अशी धावसंख्या उभारली. रॉबिन डिसोझाने ८ षट्‌कार व २ चौकारांच्या सहाय्याने ४९ चेंडूत ८४ धावांची विस्फोटक अर्धशतकी खेळी केली. इलियास नारूने २७, बुद्धदेव मंगलदासने २८ तर अन्वय नाईकने १० धावांचे योगदान दिले. आल्बर्टतर्फे टेक बहादुरने ३ तर शेर बहादुर यादवने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात आल्बर्ट डेव्हलपर्स टायगर्सचा डाव केवळ ८४ धावांत संपुष्टात आला. देविदास खोलकरने ३५ तर आनंद बद्रीने १० धावांचे योगदान दिले. पणजीतर्फे रॉबिन डिसोझाने ३ तर हेमंत खोत, विकी कारापुरकर व तुषार नार्वेकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

विजेत्या पणजी स्पोटर्‌‌स क्लबाला रु. १ लाख व झळाळता चषक तर उपविजेत्या आल्बर्ट डेव्हलपर्स टायगर्सला रु. ७५ हजार व चषक, तसेच उपांत्य फेरीतील पराभूत संघांना रोख रक्कम व चषक प्रदान करण्यात आला. बक्षीस वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री जयेश साळगावकर यांची उपस्थिती होती. त्यांच्या व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली. मालिकावीर व उत्कृष्ट फलंदाज म्हणून रॉबिन डिसोझा तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून हेमंत खोत यांची निवड करण्यात आली.

संक्षिप्त धावफलक ः पणजी स्पोटर्‌‌स क्लब, २० षट्‌कांत ६ बाद १६७, (रॉबिन डिसोझा ८४, इलियास नारू २७, बुद्धदेव मंगलदास २८, अन्वय नाईक १० धावा.