पणजी मतदारसंघासाठी इच्छुकांच्या नावांची चर्चा

0
78

मनोहर पर्रीकर हे केंद्रीय मंत्री बनल्याने सध्या रिक्त असलेल्या पणजी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास कित्येक जण इच्छुक असून भाजपतर्फे आपणाला उमेदवारी मिळावी यासाठी गौरीश धोंड हे प्रयत्नरत आहेत. कॉंग्रेस आमदार बाबुश यांनी यापूर्वीच आपण या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे.दरम्यान, पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांचाही या निवडणुकीवर डोळा होता पण बाबुश मोन्सेर्रात हे निवडणूक लढवू पाहत असल्याने त्यांची अडचण झाली आहे.
बाबुश मोन्सेर्रात रिंगणात नसते तर आपण कॉंग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले असते, असे फुर्तादो यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. या पार्श्‍वभूमीवर पणजीत कॉंग्रेसची उमेदवारी कुणाला मिळणार हे आता पाहावे लागणार आहे.