पणजी अपघातातील ‘त्या’ जखमीचे निधन

0
78

मंगळवारी बुधवारी कदंब बसस्थानकावर झालेल्या विचित्र अपघातातील जखमी योगेश हेदे याचे परवा रात्री उशिरा गोवा वैद्यकीय महाविद्यालयात निधन झाले. जीए- ०६- ३७६९ क्रमांकाची कार घेऊन पुलावरून आलेल्या पर्वरी येथील सागर वराडकर यांने जीए- ०३ सी- २४६५ क्रमांकाच्या मोटरसायकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार योगेश गंभीर जखमी झाला होता. या अपघतात पार्क करून ठेवलेल्या १६ दुचाक्याही खाली कोसळून नुकसानी झाली होती. कार चालक वराडकर यांची पोलीस चौकशी चालू आहे.