पणजीसाठी विरोधकांतर्फे एका डॉक्टरच्या उमेदवारीसाठी जोर

0
281

पणजी मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार मनोहर पर्रीकर यांच्याविरुध्द कॉंग्रेसच्या उमेदवाराची कालपर्यंत निश्‍चिती झालेली नसतानाच पणजीतील एका प्रसिध्द डॉक्टरने पर्रीकरांविरुध्द उभे रहावे यासाठीही जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.
अन्य पक्षांचे नेतेही सदर डॉक्टर उमेदवार म्हणून तयार झाल्यास पाठिंबा देण्यास तयार असल्याचे कळते. दरम्यान भारतीय भाषा सुरक्षा मंचलाही अद्याप उमेदवार सापडलेला नसून कॉंग्रेसने अशोक नाईक याना उमेदवारी दिल्यास भारतीय सुरक्षा मंचने त्यांना पाठिंबा देण्याची तयारी केली आहे. उपलब्ध माहितीनुसार अशोक नाईक कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढविण्यास तयार झाल्याचे खात्रिलायक सूत्रांनी सांगितले. कॉंग्रेस उमेदवार निवडीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी कॉंग्रेसचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार उद्या गोव्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.