कॉंग्रेसचा राजीनामा देणार
मनोहर पर्रीकर यांनी केंद्रात जाण्यासाठी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर सांताक्रुझचे आमदार आतानासियो तथा बाबूश मोन्सेरात कॉंग्रेसचा राजीनामा देणार असल्याचे वृत्त आहे. कॉंग्रेसचा राजीनामा देऊन पणजी मतदारसंघासाठी होणार्या पोटनिवडणुकीत मोन्सेरात अपक्ष म्हणून उभे राहणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. बाबूश मोन्सेरात यांच्या पत्नी ताळगावच्या आमदार आहेत. बाबूश यांच्या डावपेचामुळे सांताक्रूझ मतदारसंघासाठीही पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. दरम्यान, पणजी मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी भाजपचे बरेचजण इच्छुक असल्याची चर्चा आहे. विद्यमान नव्या घडामोडीमुळे भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचे निरीक्षकांचे मत आहे. पणजी व सांताक्रुझ अशा दोन्ही मतदारसंघांसाठी भाजपला प्रबळ उमेदवारांचा शोध घ्यावा लागेल.