पणजीत 18 जूनला ‘म्हादई जलक्रांती’

0
4

‘सेव्ह गोवा सेव्ह म्हादई फ्रंट’ येत्या 18 जून रोजी गोवा क्रांती दिनी पणजीत ‘म्हादई जलक्रांती’ आंदोलन करणार असल्याची माहिती काल फ्रंटचे नेते हृदयनाथ शिरोडकर यांनी दिली.

सदर दिवशी फ्रंटच्या नेतृत्वाखाली म्हादई प्रेमी आझाद मैदानाजवळ जमणार असून यावेळी म्हादईबरोबच राज्यातील जलसंपदा नष्ट करण्याचे जे कुकर्म राज्य सरकार करीत आहे त्याविरुद्ध आवाज उठवण्यात येणार आहे. यावेळी वेगवेगळे ठराव समंत करण्यात येणार असून विविठ मागण्या करण्यात येतील, असे शिरोडकर यांनी स्पष्ट केले. नगर नियोजन खात्याच्या 16 (ब) दुुरुस्तीमुळे पर्यावरणावर मोठा परिणाम होऊ लागला असून भू-रुपांतरामुळे जलसाठ्यांवर अनिष्ट परिणाम होत आहेत. तसेच 17 (2) या दुरुस्तीमुळेही पाण्याचे साठे कोरडे पडण्याची भीती आहे. त्यामुळे ह्या दोन्ही दुरुस्त्या रद्द करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात येणार असल्याचे शिरोडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.