पणजीत शिवसेनेचा उत्पल यांना पाठिंबा

0
9

शिवसेनेचे पणजी मतदारसंघातील उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर यांनी आपला उमेदवारी अर्ज काल मागे घेतला. काल अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपला अर्ज मागे घेऊन त्यांनी आपला पाठिंबा उत्पल पर्रीकर यांना जाहीर केला. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आपण आपला अर्ज मागे घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.