पणजीत खासगी बसेसही धावणार

0
8

पणजी स्मार्ट सिटीमध्ये कदंबाच्या ई-बसगाड्यांबरोबरच खासगी बसगाड्या सुरू ठेवण्यासाठी स्मार्ट सिटीच्या प्रस्तावित योजनेमध्ये बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती स्मार्ट सिटी प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला काल दिली. स्मार्ट सिटीतर्फे येत्या 31 ऑगस्टपर्यंत सर्व 48 कदंब ई-बसगाड्या सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती स्मार्ट सिटी प्रशासनाने गोवा खंडपीठात दिली. दरम्यान, स्मार्ट सिटी पणजीतर्फे स्मार्ट ट्रान्झिट कार्डाचा शुभारंभ काल करण्यात आला.