मनपाच्या प्रस्तावानुसार अधिसूचना जारी
उत्तर गोवा जिल्हाधिकार्यांनी काल पणजी शहरातील १८ रस्ते पे पार्किंग करण्यासाठीची अधिसूचना काढली.
पे पार्किंग म्हणून जे रस्ते जाहीर करण्यात आले आहेत त्यात १८ जून रोड (गव्हर्नादोर पेस्ताना रोड ते कुन्हा रिव्हिएरा रोड), पांडुरंग पिसुर्लेकर मार्ग (ए. बी. रोड ते एम. जी. रोड), एल्विना ब्रिटो रोड, चर्च स्न्वेअर, कुन्हा रिव्हिएरा या दरम्यानचा रस्ता ते डॉ. आर. एस. रोड (उद्याना दरम्यानचा), डॉ. आर. एस. रोड (चर्च स्न्वेअर व मेसियास गोम्स रोड या दरम्यानचा), कुन्हा रिव्हिएरा रोड (चर्च स्न्वेअर ते मेसियास गोम्स रोड), मेसियास गोम्स रोड (कुन्हा रिव्हिएरा व डॉ. आर. एस. रोड दरम्यान), टी. बी. कुन्हा रोड (एम. जी. रोड व १८ जून रोड दरम्यान), मिनेझिस ब्रागांझा रोड (डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर ते टी. बी. कुन्हा रोड या दरम्यान), आंतावर दी नोरोन्हा रोड (एम. जी. रोड व टी. बी. कुन्हा रोड व्हाया कॅफे भोसले या दरम्यान), डॉ. गोविंद वैद्य (टी. बी. कुन्हा रोड ते कुन्हा रिव्हिएरा रोड या दरम्यान), भोसले स्न्वेअर (टी. बी. कुन्हा रोड ते कुन्हा रिव्हिएरा रोड या दरम्यान), जनरल बेर्नाडो गुडिस रोड, गोसेनाडोर पेस्ताना रोड, कायतानो-द-आल्बुकुर्क रोड, डॉ. वोल्फांगो-द-सिल्वा रोड, स्वामी विवेकानंद रोड व ए. बी. रोड या रस्त्यांचा समावेश आहे.
हे रस्ते पे पार्किंग म्हणून जाहीर करण्यात यावेत असा प्रस्ताव पणजी महापालिकेने दिला होता. या प्रस्तावाला अनुसरून काल हे रस्ते पे पार्किंग करण्यासंबंधीची अधिसूचना जिल्हाधिकार्यांनी जारी केली.