पणजीतील हवा प्रदूषण रोखण्यासाठी काय केले?

0
13

पणजी महानगरपालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे होत असलेले हवा प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, तसेच रस्ता सुरक्षेबाबत काय उपाययोजना केल्या आहेत, याबाबत माहिती द्यावी, असा निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल राज्य सरकारला दिला.

पणजी स्मार्ट सिटीच्या कामामुळे त्रस्त बनलेल्या नागरिकांनी दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केल्या आहेत. या दोन्ही जनहित याचिकांवर एकत्रित सुनावणी काल घेण्यात आली. या याचिकांवरील पुढील सुनावणी बुधवार दि. 27 मार्चला घेतली जाणार आहे.

स्मार्ट सिटीच्या विकासकामांमुळे हवा प्रदूषण होत आहे, अशी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच स्मार्ट सिटीच्या कामाच्या नियोजनाच्या अभावामुळे आत्तापर्यंत तिघांचा बळी गेला आहे. रस्ता सुरक्षा उपाययोजनेबाबत दुसरी याचिका आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत आत्तापर्यंत 35 कामे पूर्ण झाली असून, केवळ 12 कामे शिल्लक असल्याची माहिती सरकारच्यावतीने न्यायालयाला देण्यात आली. 31 मेपर्यंत कामे पूर्ण करण्याचे निर्देश कंत्राटदारांना दिले आहेत आणि त्यासोबतच सर्व समस्या सोडवल्या जातील, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.