पणजीतील पे पार्किंगची अंमलबजावणी होणारच

0
83

महापौर फुर्तादो ठाम
पणजी शहरातील पे पार्किंगचा प्रश्‍न पुढील बैठकीत सोडविणार असून कोणत्याही परिस्थितीत या निर्णयाची अंमलबजावणी होणारच, असे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी सांगितले.
कोणत्या भागापासून पे पार्किंग करावे यावरच नगरसेवकांमध्ये वाद आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी झालेल्या समितीच्या बैठकीत वरील निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी अडचण आली. काही नगरसेवकांचा पे पार्कींगच्या निर्णयास विरोध आहे. त्यामुळे अंमलबजावणी लांबणीवर टाकावी लागली.
पणजी शहरात वाहनांची प्रचंड गर्दी होत आहे. काही जणांची वाहने रस्त्याच्याच बाजूला पार्क केलेली असते. त्यामुळे वाहतुकीसही अडथळा येतो. पे पार्किंग केल्यास शिस्त येऊ शकेल व महापालिकेला महसुलही मिळू शकेल, यासाठीच फुर्तादो यांनी हा प्रश्‍न धसास लावण्याचे ठरविले आहे.