पडोसे प्रकल्पातील कर्मचारी डिसेंबरपर्यंत सोसायटीत

0
79

पडोसे येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात गेली १० ते १२ वर्षे अल्पवेतनावर प्रामाणिक सेवा बजावत असलेल्या सुमारे दीडशेहून अधिक कामगारांना डिसेंबरपर्यंत सरकारच्या सोसायटीत समाविष्ट करून घेण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली. दोडामार्ग येथे ते एका कार्यक्रमासाठी आले असता कर्मचार्‍यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यावर मंत्र्यांनी सांगितले की, आवश्यक सोपस्कार पूर्ण करण्यात आले असून डिसेंबरपर्यंत या कामगारांना सोसायटीत समाविष्ट करून घेतले जाईल.