देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरुवारी सर्व राज्यांच्या
मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्ङ्गरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.
या दरम्यान ते कोविड १९ शी दोन हात करण्यासाठी राज्यांच्या तयारीचा आढावा घेतील. सोबतच, मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यात येणार्या समस्याही आणि अडचणीही ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. कोरोनाशी लढा देण्यासाठी खुद्द पंतप्रधान वारंवार तयारीचा आढावा घेताना दिसत आहेत. यापूर्वी लॉकडाऊन घोषित करण्याअगोदर वैद्यकीय तज्ज्ञासोबतही त्यांनी व्हिडिओ कॉन्ङ्गरन्सिंगद्वारे चर्चा केली होती.