पंतप्रधान मोदी शक्तिशाली; पण देव नव्हे : केजरीवाल

0
7

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी विधानसभेत संबोधित केले. राजीनामा दिल्यानंतर प्रथमच त्यांनी दिल्ली विधानसभेला संबोधित करताना भारतीय जनता पक्षावर हल्ला चढवला. मनीष सिसोदिया आणि मला इथे पाहून विरोधी पक्षातील माझ्या सहकाऱ्यांना दु:ख झाले असेल. मी नेहमी म्हणतो की पंतप्रधान मोदी खूप शक्तिशाली आहेत आणि त्यांच्याकडे भरपूर तपास यंत्रणा आहेत, पण मोदी हे देव नाहीत. देव आपल्यासोबत आहे. मला न्यायालयाचे आभार मानायचे आहेत, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.