पंतप्रधान मोदी-चीन राष्ट्राध्यक्ष आज ब्रिक्स परिषदेत भेटणार

0
2

>> मोदी-पुतिन यांच्यात झाली चर्चा

आज बुधवार 23 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे. ब्रिक्स परिषदेच्यानिमित्ताने या दोन्ही नेत्यांची आज दोन वर्षांनी भेट होत आहे. 2020 मध्ये गलवान चकमकीनंतर पहिल्यांदाच मोदी आणि जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे.
दरम्यान, काल मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी रशियातील कझान शहरात पोहोचले. येथे त्यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी युक्रेन युद्धावर भारताची भूमिका कायम ठेवताना प्रत्येक प्रश्न शांततेने सोडवला पाहिजे असे सांगितले.
पंतप्रधान मोदी आज बुधवारी ब्रिक्सच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. बैठक दोन सत्रात होणार आहे. सर्व प्रथम सकाळी बंद खोलीत चर्चा होईल. यानंतर सायंकाळी खुली सभा होईल.