पंतप्रधान मोदींना भूतानचा सर्वोच नागरी पुरस्कार प्रदान

0
25

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय भूतान दौऱ्यावर आहेत. यावेळी भूतानच्या महाराजांनी मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. ‘ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्यालपो’ हा पुरस्कार प्राप्त करणारे पंतप्रधान मोदी हे पहिलेच बिगरभूतानी नागरिक आहेत.
या पुरस्काराचे भूतानमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. समाजासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो. या पुरस्काराची सुरुवात केल्यापासून आतापर्यंत केवळ चार मान्यवारांना पुरस्कार प्रदान केला गेला आहे. पंतप्रधान मोदींना आतापर्यंत 15 देशांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून, भारतातील 140 कोटी भारतीयांचा सन्मान आहे. सर्व भारतीय नागरिकांच्या वतीने भूतानच्या या महान भूमीतील हा पुरस्कार मी नम्रपणे स्वीकारतो. तसेच या सन्मानासाठी भूतानचे आभार मानतो, असे मोदी म्हणाले.