पंतप्रधान मोदींना इजिप्तचा सर्वोच्च्च पुरस्कार

0
7

मोदींचा ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ने सन्मान

इजिप्तचा सर्वोच्च समजला जाणारा ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करून इजिप्तने मोदींना सन्मानित केले आहे. पंतप्रधान मोदी यांना गेल्या नऊ वर्षांमध्ये मिळालेला हा 13 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.

इजिप्तचे राष्ट्रपती अल – सीसी यांच्या हस्ते पंतप्रधानांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ द नाईल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची माहिती इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांनी दिली. यावेळी बोलताना त्यांनी, हा इजिप्तचा सर्वोच्च राजकीय पुरस्कार असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी यांच्या इजिप्तच्या दौऱ्यामुळे इजिप्तच्या अनेक नेत्यांनी आनंद व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा नऊ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. गेल्या नऊ वर्षांच्या काळामध्ये पंतप्रधान मोदी यांना एकूण तेरा सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

मोदी आज भारतात परतणार
पंतप्रधान मोदी 20 जून रोजी अमेरिकेच्या पहिल्या राजकीय दौऱ्यावर गेले होते. तिथे पंतप्रधान मोदींनी 21 जून रोजी न्यूयॉर्कमधील यूएन मुख्यालयात पहिल्यांदा योग दिन साजरा केला. यानंतर मोदींनी आघाडीच्या कंपन्यांच्या सीईओंचीसोबत बैठक घेऊन चर्चा केली. यानंतर पंतप्रधानांचे व्हाईट हाऊसमध्ये भव्य स्वागत करण्यात आले. तिथे त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. त्यानंतर मोदी यांनी इजिप्त देशाचा दौरा केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी उशिरा रात्री अमेरिका आणि इजिप्तच्या दौऱ्यावरून परतणार आहेत. पंतप्रधान मोदींचे विमान रात्री पालम विमानतळावर पोहोचेल. यावेळी पंतप्रधानांच्या भव्य स्वागतासाठी भाजपने मोठी तयारी केली आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी दिल्लीचे सर्व खासदार विमानतळावर उपस्थित राहणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा स्वतः रात्री विमानतळावर उपस्थित राहणार आहेत.