गोवा विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचारासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरुवार दि. १० रोजी गोव्यात आगमन होणार आहे. संध्याकाळी ५ वाजता म्हापशातील बोडगेश्वर देवस्थानच्या पटांगणात त्यांची सभा होणार आहे.
मोदींच्या सभेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दाबोळी विमानतळावर आगमन झाल्यानंतर हेलिकॉप्टरने ते म्हापसा येथे दाखल होणार आहेत. हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी खास हेलिपॅडची उभारणी करण्यात आली आहे.