पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ एप्रिलला मुंबईत

0
13

गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. ११ एप्रिल रोजी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, येत्या २४ एप्रिलला मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: उपस्थित राहणार आहेत.

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा देशसेवा आणि समाज कार्यासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे. देशाप्रती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचे काम आणि सेवा बघून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः मुंबईत उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, २४ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काश्मीरमध्ये नियोजित कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम संपल्यानंतर पंतप्रधान काश्मीरवरून मुंबईत येणार आहेत.