पंतप्रधानांहस्ते आयएनएस कोलकाता नौदलाच्या ताब्यात

0
77

पूर्णतः भारतीय बनावटीची आयएनएस कोलकाता ही युद्ध नौका काल एका समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. संरक्षण मंत्री अरुण जेटली तसेच नौदल प्रमुख ऍडमिरल आर. के. धोवन हेही यावेळी उपस्थित होते. या युद्धनौकेच्या बांधणीत सहभागी असलेल्या सर्वांचे मोदी यांनी अभिनंदन केले. ही युद्धनौका म्हणजे भारतीय अभियंते, तंत्रज्ञ तसेच सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेची साक्ष असल्याचे मोदी यावेळी म्हणाले. पूर्णतः भारतीय संरक्षण तंत्रज्ञानात सुधारणा घडविण्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात आली असून अंदाजपत्रकातही त्यासाठी तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संरक्षण विषयक उपकरणे निर्यात करणारा प्रमुख देश म्हणून भारताला पुढे नेण्याचे आपले स्वप्न असल्याचे ते म्हणाले. ६८०० टन वजनाची ही युद्धनौका माझगाव डॉकमध्ये बांधण्यात आली. तिची रचना नौदलाच्या रचना विभागाने केली आहे.