पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. २९ रोजी आसाम दौर्यावर येण्याचे ठरले असताना, काल दोन विविध ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणावर स्फोटके जप्त केली. पोलिसांशी चकमकीत एक उल्फा बंडखोरही ठार झाला. स्फोटके घेऊन जाणारी वाहने व त्याच्या चालकांनाही ताब्यात घेतले आहे. तिनसुखिया जिल्ह्यात, पोलिसांनी चार रॉकेट लॉंचर्स, एक कार्बाईन, ४० जीवंत काडतुसे, पाच स्फोटके तर दिसपूर परिसतरात जीलेटीन कांड्यांची तीन पाकिटे, १८०० डिटोनेटर्स, १२ पाकिटे कोर्डेक्स जप्त केले.