पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीस उपस्थिती न लावण्याच्या प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निर्णयावर भाजपने टिका केली आहे. भाजपचे सरचिटणीस श्रीकांत शर्मा यांनी ममता बॅनर्जी यांनी आपल्या राज्याच्या विकासासाठी आपला निर्णय बदलावा असे आवाहन केले. देशाच्या विकासाला मोदी यांचे प्राधान्य असल्याने बॅनर्जी यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवावेत असेही सुचविले.