पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौर्याची देशात तसेच जगभरात चर्चा होत असते. आता राज्यसभेत पंतप्रधानांच्या दौर्यावर झालेल्या खर्चाशी संबंधित सर्व तपशील जाहीर करण्यात आला. त्यात मोदींनी गेल्या ५ वर्षांत ३६ परदेश दौरे केले असून, त्यावर जवळपास २६ कोटींचा खर्च आला आहे.
पंतप्रधानांच्या प्रत्येक दौर्यावर किती खर्च झाला, याची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री मुरलीधरन यांनी राज्यसभेत सार्वजनिक केली. अलीकडेच पंतप्रधान मोदी बाली दौर्यावर गेले होते, तेव्हा त्या दौर्यावर ३२ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. याशिवाय पंतप्रधान २०२२ च्या सुरुवातीला युरोप दौर्यावर होते. त्या दौर्यावर सुमारे २.५० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
२०१९ मध्ये २१ ते २८ सप्टेंबर या कालावधीत पंतप्रधान अमेरिकेच्या दौर्यावर होते. या दौर्याचा एकूण २३.२७ कोटी रुपये खर्च आला. याच दौर्यावर सर्वाधिक खर्च झाला होता.