पंजाबमध्ये शाळा सुरू केल्यावर २० मुले बाधित

0
51

पंजाबमध्ये शाळा सुरू केल्यानंतर काही दिवसांतच २० मुलांना कोरोनाची लागण झाली. पंजाबमध्ये दोन सरकारी शाळांमधील २० विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह असल्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली. पंजाबमध्ये २६ जुलैपासून दहावी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्यानंतर पंजाबच्या मुख्य सचिवांकडून प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचण्या कल्यावर दोन शाळांमधील विद्यार्थी पॉझिटीव्ह आढळले आहेत. लुधियानातील २ शाळांमधील २० विद्यार्थी कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. या विद्यार्थ्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.