पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडताना एका पाकिस्तानी घुसखोराला ठार केले. घुसखोर गुरुदासपूर सेक्टरमधून भारतीय हद्दीत घुसले होते. ही घटना बसंतर नाल्याजवळ घडली. दरम्यान, रविवारी रात्री पाकिस्तानी द्रोन भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते, मात्र सुरक्षा दलांनी त्यांच्यावर गोळीबार करून त्यांना परतवून लावले. घुसखोरीच्या घटनांमध्ये आधी द्रोन येतात आणि त्यानंतर दहशतवादी घुसतात.