पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी चरणजीत सिंग चन्नी

0
56

पंजाब कॉंग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी पंजाबचे चरणजीत सिंग चन्नी हे नवे मुख्यमंत्री असतील, असे ट्वीट करून सांगितले आहे. पंजाब कॉंग्रेसच्या विधिमंडळ पक्ष नेतेपदी चरणजीतसिंग चन्नी यांची एकमताने निवड झाली असल्याचेही रावत यांनी सांगितले.

चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पंजाब कॉंग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी वरिष्ठ नेत्यांसह राज्यपालांची भेट घेतली. दरम्यान, चन्नी यांची मुख्यमंत्रिपदासाठी निवड करण्याअगोदर सुखजिंदर सिंग रंधवा यांच्या नावाची चर्चा होती. पण रंधवा यांच्या नावाला काही आमदारांनी समर्थन दिले नाही. तसेच नव्या मुख्यमंत्र्यांना जास्तीत जास्त आमदारांचे समर्थन मिळेल, याचा प्रयत्न कॉंग्रेस हायकमांडकडून करण्यात आला. यातूनच मुख्यमंत्रीपदासाठी चन्नी यांचे नाव निश्चित करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांच्या निवडीसंदर्भात कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे, असे जाहीर केल्यानतंर काही वेळातच चन्नी यांची पंजाब कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.