पंच आत्महत्या ः सखोल चौकशीची मागणी

0
143

मेरशी पंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान पंच प्रकाश नाईक यांनी केलेल्या आत्महत्येची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पार्टीने केली आहे.

प्रकाश नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी वॉट्‌स ऍप ग्रुपसह विविध मित्रांना मेसेजेस पाठवून विल्सन गुदिन्हो व ताहीर या व्यक्ती आपली सतावणूक करीत असल्याचे म्हटले होते. तसा संदेश त्यांनी आपल्या बहिणीलाही पाठवला होता, असे सांगून या प्रकरणाचा सखोल तपास होण्याची गरज असल्याचे गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रवक्ते दुर्गादास कामत म्हणाले.

सध्या गोव्यात राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्याचे या प्रकरणावरून स्पष्ट झाले आहे असा दावा कामत यांनी केला. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचेही ते म्हणाले.