पंचायत निवडणुकांसाठीच्या अर्जांची छाननी करण्याचे काम काल पूर्ण झाले. गोवाभरातील छाननीत काल किती अर्ज बाद ठरले त्याचा अहवाल तयार करण्याचे काम काल राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात उशिरापर्यंत चालू होते, असे कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.
उद्या ३ मे रोजीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्यानंतरच दर एका पंचायतीतील चित्र स्पष्ट होणार आहे. पंचायत निवडणुका पक्षाच्या उमेदवारीवर लढवल्या जात नसल्या तरी सर्वच पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना निवडणूक रिंगणात उतरवित असतात.
दरम्यान, राज्यात होऊ घातलेल्या पंचायत निवडणुकात एकाच पक्षाचे कितीतरी कार्यकर्ते एका-एका प्रभागातून निवडणूक लढवित असल्याने आपल्याच कार्यकर्त्यांमध्ये लढत होऊ नये यासाठी सत्ताधारी भाजप व विरोधी कॉंग्रेस पक्ष प्रयत्नरत आहेत. या निवडणुकीसाठी एकूण १०८३२ जणांनी अर्ज भरले आहेत.

