मापा-पंचवाडी येथे काल झालेल्या एका स्वयंअपघातात एका 11 वर्षीय मुलासह युवतीचा मृत्यू झाला.वाहनचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कारची रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जोरदार धडक बसली. त्यात पाज शिरोडा येथील सिद्धम नाईक (11 वर्षे) आणि रिवण येथील युवती रेशम नाईक (18 वर्षे) यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब शिर्डीहून नुकतेच परतले होते आणि नातेवाईकांना रिवण येथे सोडण्यासाठी जात होते. या अपघातात महादेव नाईक, पूर्वा नाईक, सौम्या नाईक, राधिका नाईक व रोहिणी नाईक (सर्व रा. शिरोडा) हे जखमी झाले.