न्हावेली-साखळीतील अपघातात महिला ठार

0
3

न्हावेली-साखळी येथे ट्रक व दुचाकी यांच्यात काल झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली. वृशाली संजय सुर्लकर (रा. सुर्ल साखळी) असे मृत महिलेचे नाव आहे. सविस्तर माहितीनुसार, जीए-04-टी-0612 हा ट्रक न्हावेली येथून सुर्लच्या दिशेने जात होता, तर जीए-04-पी-9899 क्रमांकाच्या दुचाकीवरून सदर महिला व अन्य एक जण सुर्ल येथून न्हावेलीच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या.