‘न्यूड’ चित्रपटाला सेन्सॉरकडून लाभले ‘अ’ प्रमाणपत्र

0
113

गोव्यात गेल्या नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या ४८ व्या इफ्फी चित्रपट महोत्सवातून वगळण्यात आलेल्या ‘न्यूड’ या दिग्दर्शक रवी जाधव यांच्या मराठी चित्रपटाला सेन्सॉर बोर्डने कोणत्याही कटविना प्रमाणित केले आहे. या चित्रपटाला ‘अ’ प्रमाणपत्र मिळाले आहे.

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ‘न्यूड’ चित्रपट इफ्फीत दाखवला जाणार होता. मात्र अंतिम यादीतून नंतर त्याला वगळण्याचा निर्णय केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने घेतला होता. महोत्सवाच्या परीक्षकांना कोणतीही माहिती न देता हा चित्रपट वगळण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. न्यूड मॉडेल असलेल्या एका महिलेचा मुंबईत जगण्यासाठी सुरू असलेला संघर्ष या चित्रपटात दाखविण्यात आला आहे.

४८ व्या इफ्फीच्या इंडियन पॅनोरमा विभागातील एकूण १३ परीक्षकांनी २६ चित्रपटांपैकी न्यूड व एस दुर्गा हे चित्रपट निवडले होते. न्यूड ला शुभारंभी चित्रपटाचा मानही मिळाला होता.