न्यायालयाच्या जागेतील कार्यालय खाली करण्याचे ‘आप’ला आदेश

0
4

लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असताना सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाला काल जोरदार धक्का दिला. राऊज ॲव्हेन्यूतील कार्यालय 15 जूनपर्यंत रिकामी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याचे यावेळी आपकडून न्यायालयाला सांगण्यात आले. त्यामुळे न्यायालयाने त्यांना कार्यालय रिकामे करण्यासाठी 15 जूनपर्यंतची मुदत दिली. निवडणूक निकालानंतर आपला कार्यालय सोडावे लागणार आहे.

आम आदमी पक्षाचे राऊज ऍव्हेन्यूतील कार्यालय दिल्ली उच्च न्यायालयाला देण्यात आलेल्या जमिनीवर अतिक्रमण करुन बांधले आहे. या जमिनीचा वापर राउज ऍव्हेन्यू कोर्टच्या विस्तारासाठी व्हायला हवा. इथे एक अतिरिक्त कोर्टरुम उभारायची आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला 3 महिन्यांची अतिरिक्त वेळ देत आहोत. त्यानंतर तुम्हाला ही जमीन सोडावी लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने आपच्या वकिलांना सांगितले.