मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती यू. व्ही. बाक्रे यांनी गोवा सरकारने त्यांना देऊ केलेले लोकायुक्तपद स्वीकारण्यास काल नकार दिला. न्यायमूर्ती बाक्रे यांनी यापूर्वी गोवा सरकारला सदर पदासाठी आपली संमती कळवली होती. मात्र, वैयक्तिक कारणामुळे आपण सदर पद स्वीकारू शकत नसल्याचे आता त्यांनी सरकारला कळवले आहे.
बाक्रे यांची लोकायुक्तपदी नियुक्ती करण्यासाठी सरकारने विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्याकडे त्यांची संमती मागितली होती. कामत यांनी त्याबाबत आपण योग्य तो निर्णय घेऊ असे म्हटले आहे.