नौका उलटून तिघा मच्छिमारांचा मृत्यू

0
7

आचरा-मालवण समुद्रातील दुर्दैवी घटना

सिंधुदुर्गातील आचरा-मालवण समुद्रात मासेमारीसाठी गेलेली नौका उलटून तिघा मच्छिमारांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथून मासेमारीला गेलेली नौका आचरा नजीकच्या समुद्रात दुर्घटनाग्रस्त झाली. या दुर्घटनेत नौकेतील चारही मच्छिमारांनी नौकेतून समुद्रात उडी घेतल्यानंतर तिघांचा बुडून मृत्यू झाला, तर एकाने पोहत येऊन पहाटे आचरा किनारा गाठल्याने त्याचे प्राण वाचले. मृत्यू पावलेल्या तिघांमध्ये नौकामालक आणि सेवानिवृत्त शिक्षक गंगाराम आडकर यांच्यासह खलाशी प्रसाद भरत सुर्वे (वय 32) आणि लक्ष्मण शिवाजी सुर्वे (वय 65) यांचा समावेश आहे. विजय अनंत धुरत (53, रा. मोर्वे देवगड) यांनी किनारा गाठण्यात यश मिळवल्याने ते बचावले.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्जेकोट येथील गंगाराम उर्फ जीजी आडकर हे रविवारी रात्री आपली जनता जनार्दन या नावाची मच्छिमारी नौका घेऊन तीन खलाशांसह समुद्रात मासेमारीला गेले होते. कुणकेश्वर येथील समुद्रात मासेमारी करून जाळी ओढल्यावर ते माघारी परत असताना मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास नौका हेलकावे घेऊन त्यात पाणी भरू लागल्याने जीव वाचवण्यासाठी चौघांनीही समुद्रात उड्या घेतल्या.