नोव्हेंबरमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूंत घट

0
194

>> काल तिघे दगावले; एकूण संख्या ६६२

राज्यात चोवीस तासांत आणखी ३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोना बळींची एकूण संख्या ६६२ एवढी झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत कोरोना विषाणूने ५८ जणांचा बळी घेतला आहे.

बांबोळी येथील गोमेकॉमध्ये २ कोरोना रूग्ण आणि मडगाव येथील ईएसआय इस्पितळात १ कोरोना रुग्णाचे निधन झाले आहे. दवर्ली येथील ६५ वर्षीय रुग्ण, वास्को येथील ७५वर्षीय रुग्ण आणि हणजूण येथील ६४ वर्षीय रुग्णाचे निधन झाले आहे.

राज्यात नोव्हेंबर महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट दिसून येत आहे. या महिन्यातील पहिल्या चौदा दिवसांत २० हजार ५०२ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील २ हजार २१९ स्वॅबचे नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. याच काळात राज्यात २ हजार ८५५ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९६ टक्के एवढे आहे.

राज्यात ऑक्टोबर महिन्यात तुलनेत नोव्हेंबर महिन्यात कोरोना रुग्णाचे प्रमाण असल्याचे दिसून येत आहे. हिवाळा सुरू झाल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले जात आहे. हिवाळ्यात देशातील काही भागांत कोरोना रुग्णाच्या प्रमाणात वाढ झाली आहेत.
राज्यात सरासरी १४०० च्या आसपास स्वॅबच्या नमुन्याची तपासणी केली जात आहे. कोविड स्वॅबच्या नमुन्याची तपासणी दरदिवशी दोन हजारांवर वाढविण्याची घोषणा करण्यात आली होती. तथापि, अजूनपर्यंत स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी वाढलेली नाही.

काल तिघे
दगावले; एकूण संख्या ६६२