नोव्हेंबरपासून पुन्हा ग्रामसभा ः माविन

0
102

कोरोना महामारीमुळे बंद पडलेल्या ग्रामसभा नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून पुन्हा सुरू करण्यात याव्यात अशी सूचना पंचायतींना करण्यात येणार असल्याचे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी काल स्पष्ट केले. गटविकास अधिकार्‍यांना आपण पंचायतींना तशी सूचना करण्यास सांगणार असल्याचे गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.

कोरोना महामारीमुळे राज्यातील पंचायतींत गेल्या सहा महिन्यांपासून ग्रामसभा होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे पंचायतीतील महत्त्वाच्या विषयांवर गेल्या सहा महिन्यांत चर्चा होऊ शकली नसल्याचे माविन गुदिन्हो यांनी स्पष्ट केले. आता पुढील महिन्याच्या मध्यापासून पंचायतीच्या ग्रामसभा घेतल्या जाणार असल्याचे गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.