नोकरीच्या बहाण्याने दोघांची 18.5 लाखांना फसवणूक

0
3

नवेवाडे येथील कॅप्टन जॉर्ज कन्सल्टन्सीच्या स्टॅनी जॉर्जविरुद्ध यूएसमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने दोन पीडितांची 18.5 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी, वास्को पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. सदर पीडितांना नोकरी देण्याऐवजी बेकायदेशीररीत्या मेक्सिकोमार्गे पाठवण्यात आले. मेक्सिकोमध्ये त्यांना पकडून पुन्हा भारतात रवाना करण्यात आले.

अधिक माहितीनुसार गोव्यातील दोन तरुण रिक्रूटमेंट एजंटने केलेल्या नोकरीच्या बहाण्याला बळी पडले आहे. दि. 17 फेब्रुवारी रोजी, सारझोरा येथील 23 वर्षीय डव्हिन्सेंट मास्करेन्हस आणि पंचवाडी, शिरोडा येथील ग्लॅडसन सोझा यांनी वास्कोतील नवेवाडे येथील कॅप्टन जॉर्ज कन्सल्टन्सीच्या स्टॅनले जॉर्जविरुद्ध तक्रार दाखळ केली आहे. सदर तक्रारींनुसार, दोन्ही पीडितांना अमेरिकेतील हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यासाठी मस्कारेन्हासने 8 लाख, तर सौझाने 10.5 लाख रुपये दिले. यानंतर त्यांना अमेरिकेऐवजी बेकायदेशीरपणे मेक्सिकोला पाठवण्यात आले.