नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक, एकास अटक

0
5

ओल्ड गोवा पोलिसांनी सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सहा लाख रुपयांची फसवणूक प्रकरणामध्ये शिवा मोरे (मेरशी) याला काल अटक केली आहे. नाविक दलातील एका निवृत्त अधिकाऱ्यांच्या मुलाला सरकारच्या अबकारी खात्यात नोकरीचे आमिष दाखवून सहा लाख रुपयांचा गंडा घालण्यात आलेला आहे. या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संशयित शिवा मोरे याने नोकरीचे बनावट दस्तऐवज तयार करून दिले होते. त्या निवृत्त अधिकाऱ्याने याबाबत सरकारी खात्यात चौकशी केली असता सदर कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी ओल्ड गोवा पोलीस तपास करीत आहेत.