मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळातील (गोमेकॉ) नोकरभरती गैरव्यवहाराविषयीची याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेचा जो निकाल लागेल, त्यावर भरती झालेल्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. पणजी येथील शैलेंद्र वेलिंगकर यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली आहे. नोकरभरती करताना नियमांचे पालन करण्यात आले नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. दरम्यान, गोमेकॉतील पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे.