नेसाय येथील औद्योगिक वसाहतीत दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अब्दुल बाशाकद्री (21) या युवकाचे दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात निधन झाले. या अपघातातील दुसरा दुचाकीस्वार शरद मळकर्णेकर गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. अब्दुल हा मिनेझीस भाट, सां जुझे आरियल येथील रहिवासी आहे. मायणा कुडतरी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.