नेपाळमधील भूकंपात मृत्यूंची संख्या 157

0
22

नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा बसलेल्या भूकंपाच्यातीव्र धक्क्यात आतापर्यंत 157 बळी गेले असून जवलजवळ 4300 घरे उद्ध्वस्त झाली आहेत. त्याचबरोबर 200 लोक जखमी झाले आहेत. पश्चिम नेपाळमध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. भूकंपामुळे जाजरकोट जिल्ह्यातील 1,800 तर रुकुम पश्चिममध्ये 2,500 घरे उद्ध्वस्त झाली आहेत. भूकंपग्रस्त भागातील बेघर लोकांना तंबू, ब्लँकेट आणि अन्नपदार्थांची नितांत गरज असल्याचे सांगण्यात येत आहे. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी भूकंपग्रस्त भागाला भेट देऊन लोकांची भेट घेतली. भारताने नेपाळमध्ये राहणाऱ्या भारतीय भूकंपग्रस्तांसाठी +977-9851316807 हा आपत्कालीन क्रमांक जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमधील भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानाबद्दल शोक व्यक्त केला आहे.