नेत्रावळी येथे शुक्रवारी रात्री वादळी वार्याचा तडाखा बसल्याने घरे व कुळागरांची हानी होऊन सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले.
केपेचे उपजिल्हाधिकारी अजित पंचवाडकर यांनी काल घटनास्थळी जाऊन जागेची पाहणी केली. यावेळी सुमारे १५ घरांना वादळाचा तडाखा बसल्याने नासधूस झाल्याचे स्थानिक पंच विशाल नाईक यांनी निदर्शनास आणले. हेमा नाईक, सुभाष फडते, भागिरथी प्रभुदेसाई, गुरु देसाई, श्याम च्यारी, रामदास गवळी यांच्या घरांचे व बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घराचीही हानी झाली असून केळी माडी बागायतीचे नुकसान झाले.
सांगेचे कृषी अधिकारी दत्तप्रसाद देसाई यांनीही पंच विशाल नाईक, सरपंच शशिकांत गावकर व इतरांसोबत जाऊन पाहणी केली.